Saturday, October 29, 2022

नोव्हेंबर दिनविशेष November Dinvishesh

 *नोव्हेंबर दिनविशेष*

संकलन:श्री.नंदकुमार विठोबा रेडेकर ,जिल्हा परिषद शाळा आरल पुन.

नोव्हेंबर १:

१९५६ - कर्नाटक केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना

जन्म:

१९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते

१९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री

१९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू

राज्य स्थापना दिन - केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश

जागतिक वनस्पतीभक्षक दिन


नोव्हेंबर २:

२००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पहिले रहिवासी पोचले.

जन्म:

१८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष

१९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता

मृत्यू:

१९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक


नोव्हेंबर ३:

१८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना

१९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले 

२००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली

जन्म:

१६१८ - औरंगझेब, मोगल सम्राट

१९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ


नोव्हेंबर ४:

जन्म:

१८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक

१९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला

१९७२ - तब्बू, हिंदी चित्रपट अभिनेत्री


नोव्हेंबर ५:

२००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत

२०१३ - इसरो चे मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण

जन्म:

१९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार

१९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू


नोव्हेंबर ६:

१८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६ वे राष्ट्राध्यक्ष झाला

१९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक


नोव्हेंबर ७:

१९९६ - नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण

जन्म:

१८२४: डॉ. भाऊ दाजी लाड 

१८६७ - मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ

१८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ

१९५४ - कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता

१९८१ - अनुष्का शेट्टी, भारतीय अभेनेत्री

मृत्यू:

२००० - चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी

२००६ - पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू


नोव्हेंबर ८:

२०१६- तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

२०१६-डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले

जन्म:

इ.स. १९१९ - पु. ल. देशपांडे 


नोव्हेंबर ९:

१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

मृत्यू:

इ.स. २००५ - भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन 


नोव्हेंबर १०:

१६५९-शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

इ.स. १७९२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसची पायाभरणी.


नोव्हेंबर ११:

१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

इ.स. १९१८ - पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.

जन्म:

१८८८- स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद


नोव्हेंबर १२:

१८९६ - पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म.

१९०४ - भारतीय स्वातंत्र्यसैनिक एस.एम. जोशी यांचा जन्म.


नोव्हेंबर १३:

१९१३-रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.

जन्म:

१७८०: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग 

१९१७: महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील


नोव्हेंबर १४: 

बाल दिन

इ.स. १८८९ - भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.


नोव्हेंबर १५:

इ.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

इ.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.


नोव्हेंबर १६:

१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

मृत्यू:

१९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले


नोव्हेंबर १७:

१९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली

इ.स. १९५० - तेन्झिन ग्यात्सो यांचा १४वे दलाई लामा म्हणून राज्याभिषेक.


नोव्हेंबर १८:

१९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

जन्म-

१९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम 


नोव्हेंबर १९:

२०१३: राष्ट्रीय एकत्मता दिन

१९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना

जन्म:

इ.स. १८२८ - काशी येथे मणिकर्णका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई 


नोव्हेंबर २०:

१९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

जन्म:

इ.स. १७५० - टिपू सुलतानचा 


नोव्हेंबर २१:

१९६२- भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

१९६२- भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

इ.स. १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.


नोव्हेंबर २२:

१९६३- थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

इ.स. १९६३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची हत्या.


नोव्हेंबर २३:

मृत्यू:

१९३७-नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. 

१९५९-अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. 


नोव्हेंबर २४:

१८५९-चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

१९६९-अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

जन्म:

१९३७- मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम

मृत्यू:

१६७५-शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर 


नोव्हेंबर २५:

१६६४-छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

१९४८-नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.

जन्म:

१८७२-ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

१९२१- नटवर्य भालचंद्र पेंढारकर

मृत्यू:

१९८४-भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण


नोव्हेंबर २६:

इ.स. १९४९ - २६ नोव्हेंबर ला संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस "भारतीय संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो.

इ.स. २००८ - मुंबईवर १० पकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला


नोव्हेंबर २७:

जन्म:

१८७०- इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस

१८८१-प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल 

१९०७-विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन


नोव्हेंबर २८:

मृत्यू:

१८९०-श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले 

१९६७-सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट


नोव्हेंबर २९:

जन्म:

१८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा

मृत्यू:

१९३९- मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन

१९९३-जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा


नोव्हेंबर ३०:

जन्म:

१८५८-भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

१९३५- मराठी लेखक आनंद यादव

No comments:

Post a Comment