Thursday, September 29, 2022

ऑक्टोबर दिनविशेष|Dinvishesh October

 *ऑक्टोबर दिनविशेष*

                       संकलन-श्री.नंदकुमार रेडेकर जिल्हा परिषद शाळा आरल पुन.9404968216

ऑक्टोबर १:

१८५४-भारतात पहिले पोस्टाचे तिकीट छापण्यात आले

१९५८ - नासाने आपले कार्य सुरू केले. 

जन्म:

१८९६ - लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान.

१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.


ऑक्टोबर २:

१९७२-मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात

जन्म:

१८६९ - महात्मा गांधी.

१९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.

१९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार

मृत्यू:

१९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.


ऑक्टोबर ३:

१८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थॅंक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला.

१९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.


ऑक्टोबर ४:

राष्ट्रीय एकात्मता दिन

जन्म:

१६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.

१८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.

१९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.

मृत्यू:

१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.


ऑक्टोबर ५:

१८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.

मृत्यू:

१९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.


ऑक्टोबर ६:

मृत्यू:

१६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.

१८५८:दुसरे नानासाहेब पेशवे

१९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.


ऑक्टोबर ७:

जन्म:

१८६६:थोर साहित्यिक केशवसुत


ऑक्टोबर ८:

वायुसेना दिवस

१९०५-विलायती कापडाची पहिली होळी


ऑक्टोबर ९:

भारतीय टपाल दिन

मृत्यू:

१८९२-लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख


ऑक्टोबर १०:

जन्म:

१९०२ - आर.के. नारायण - भारतीय लेखक (मृ. २००१)

१९५४ - रेखा - भारतीय अभिनेत्री

इ.स. १९३१ - भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम

मृत्यू:

१९६४ - गुरुदत्त - भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते


ऑक्टोबर ११:

जन्म:

१९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी (मृ: १९७९)

१९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते (मृ: २०१०)

१९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता

१९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता

मृत्यू:

१९६८:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


ऑक्टोबर १२:

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा एडन तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न

जन्म:

१९३५: शिवराज पाटील - भारतीय राजकारणी 

मृत्यू:

१९६७: राम मनोहर लोहिया - भारतीय राजकारणी (ज. १९१०)


ऑक्टोबर १३:

जन्म:

१९११: अशोक कुमार - भारतीय अभिनेता 

मृत्यू:

१९११: भगिनी निवेदिता - आयरिश - भारतीय सामाजिक कार्यकर्ती (ज. १८६७)

१९८७: किशोर कुमार - भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक


ऑक्टोबर १४:

१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश.

जन्म:

१९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.

मृत्यू:

१९४७-साहित्य सम्राट न.चि. केळकर


ऑक्टोबर १५:

१९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण

जन्म:

१५४२ - अकबर,मोगल बादशहा

१९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक

१९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती

१९५७ - मीरा नायर भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती

मृत्यू:

१९१८ - साई बाबा (शिर्डी)

१९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक 


ऑक्टोबर १६:

१९६८-वैज्ञानिक हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक

१९०५ - लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला

१९५१ - पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या

१९७८ - जॉन पॉल दुसरा पोपपदी

जन्म:

१८९० - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक

१९४८ - हेमामालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९५९ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक

मृत्यू:

१९५० - वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक


ऑक्टोबर १७:

मृत्यू:

१८८२-व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग


ऑक्टोबर १८:

१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली

१९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले

जन्म:

१९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता

 क्रिकेट खेळाडू

मृत्यू:

१८७१ - चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक

१९३१ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक

१९९८ - शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार

२००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर


ऑक्टोबर १९:

१९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले

जन्म:

१९१०-भारतीय खगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रह्मण्यम

१८७१ - डॉ. वॉल्टर कॅनन, वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष किरणांचा सर्वप्रथम उपयोग करणारा

१९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार

१९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक


ऑक्टोबर २०:

१९६९-पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापना

जन्म:

१९६३ - नवज्योतसिंग सिद्धू - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९७८ - वीरेंद्र सेहवाग - भारतीय क्रिकेट खेळाडू

मृत्यू:

१९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट

ऑक्टोबर २१:

१९४३-सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली.

जन्म:

१९२३ - सद्गुरु श्री वामनराव पै - जीवन विद्या मिशनचे संस्थापक 


ऑक्टोबर २२:

२००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण

मृत्यू:

१९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष

१९७८ - ना.सी. फडके, मराठी कादंबरीकार


ऑक्टोबर २३:

मृत्यू:

१९१८-टायफॉईडच्या जंतूंचा शोध लावणारा संशोधक जॉर्जे गाफकी


ऑक्टोबर २४: 

संयुक्त राष्ट्र संघटना दिन

झाम्बियाचा स्वातंत्र्यदिन.


ऑक्टोबर २५:

२००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

मृत्यू:

१२९६-संत ज्ञानेश्वर समाधी


ऑक्टोबर २६:

१९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली

जन्म:

१२७०-संत नामदेव

१९४७ - हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी

१९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री


ऑक्टोबर २७:

मृत्यू:

१७९५-सवाई माधवराव


ऑक्टोबर २८:

जन्म:

१९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती

१९५८ - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मृत्यू:

१८११-सरदार यशवंतराव होळकर


ऑक्टोबर २९:

१९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार

मृत्यू:

१९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक


ऑक्टोबर ३०:

जन्म:

१९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ

१९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते

मृत्यू:

१९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी


ऑक्टोबर ३१:

१८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

१८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग

१९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

१९९९ - कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला

जन्म:

१८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान

१८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू

मृत्यू:

१९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार

१९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान

No comments:

Post a Comment