द्रौपदी मुर्मू एक शिक्षिका ते देशाच्या राष्ट्रपती
![]() |
द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. सर्वोच्च घटनात्मक पदासाठी संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. द्रौपदी मुर्मू या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथील आदिवासी नेत्या आहेत. द्रौपदी मुर्मू या एक मृदुभाषी नेत्या आहेत. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
कौटुंबिक माहिती
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी मुलगे मरण पावले आहेत
त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या.
शिक्षिका
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.
राजकीय प्रवास
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.२०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
No comments:
Post a Comment