Saturday, July 30, 2022

राजे शिवछत्रपती प्रश्नमंजुषा बजाज:२३

 

लोकमान्य टिळक Lokmanya Tilak

 


बाळ गंगाधर टिळक(केशव गंगाधर टिळक)

 जन्म:जुलै २३,इ.स. १८५६ - 

मृत्यू:ऑगस्ट १इ.स. १९२० 

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच"

अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे लोकमान्य टिळक

कौटुंबिक माहिती-

टिळकांचा जन्म २३ जुलैइ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय .कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती

टिळक व चिपळूणकर:

निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णूशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.

दुष्काळ काळातील भूमिका:

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले

जहालमतवादी टिळक

तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

वर्तमानपत्र व लेखन:

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी 'चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी'त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी 'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी 'चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत

यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-


टिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. महादेव गोविंद रानडेडब्ल्यू.सी. बॅनर्जीविष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.

शिवजयंती व गणेश उत्सव:
राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरुपात साजरी केले. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.
 असंतोषाचे जनक:
सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले; पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’–भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रुढ केले.

             संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर

ऑगस्ट ,दिनविशेष

 दिनविशेष ऑगस्ट:संकलन-श्री.नंदकुमार रेडकर जिल्हा परिषद शाळा आरल ,पाटण सातारा

*ऑगस्ट १*

१२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.

जन्म:

१९२०-आण्णाभाऊ साठे

मृत्यू:

१९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक .

*ऑगस्ट २:*

जन्म:

१८६१-संशोधक प्रफुल्लचंद्र रे

मृत्यू:

१९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वे राष्ट्राध्यक्ष.

*ऑगस्ट ३*

जन्म:

१९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.

*ऑगस्ट ४*

जन्म:

१८९४-ना.सी.फडके

१९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.

१९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी

*ऑगस्ट ५*

जन्म:

१८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.

१९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.

*ऑगस्ट ६*

१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.

मृत्यू:

१९२५-सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*ऑगस्ट ७*

मृत्यू:

१९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.

*ऑगस्ट ८*

१५०९ - सम्राट कृष्णदेवरायाचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.

१९४२ - अखिल भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो मोहिमेस सुरुवात केली.

*ऑगस्ट ९*

क्रांतिदिन

१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.

१९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.

१९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.

*ऑगस्ट १०*

जन्म:

१८९४:भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी.

१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.

*ऑगस्ट ११*

२००८ - अभिनव बिंद्राने १० मी. हवाई रायफल मध्ये भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे २८ वर्षांनंतरचे पहिले सुवर्णपदक आहे.

*ऑगस्ट १२*

जन्म:

१८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.

१९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.

मृत्यू:

१८४८-आगगाडी जनक जॉर्ज स्टिफन्सन

*ऑगस्ट १३*

जन्म:

१८९८ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी.

*ऑगस्ट १४*

पाकिस्तानी स्वतंत्र दिवस (१९४७).

१९४७ पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.

*ऑगस्ट १५*

 भारतीय स्वातंत्र्यदिन

जन्म:

१७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.

१८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.

*ऑगस्ट १६*

मृत्यू:

१५००-संत रोहिदास

१८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.

*ऑगस्ट १७*

१६६६:छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका

*ऑगस्ट १८*

जन्म:

१६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

१८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

मृत्यू:

१९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.

२००८ - नारायण धारप, मराठी लेखक.

*ऑगस्ट १९*

मृत्यू:

१८१९-जेम्स व्याट

*ऑगस्ट २०*

१८२८-राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

जन्म:

१९४४ - राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.

१९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.

*ऑगस्ट २१*

जन्म:

१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.

मृत्यू:

१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

१९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ

२००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता

२००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.

*ऑगस्ट २२*

जन्म:

१९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.

*ऑगस्ट २३*

१९५८-मराठवाडा विद्यापीठ प्रारंभ

*ऑगस्ट २४*

मृत्यू:

सर रामकृष्ण गोपाळ

*ऑगस्ट २५*

१६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

२००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.

२००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.

जन्म:

१९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.

१९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.

*ऑगस्ट २६*

१३०३ - अलाउद्दीन खिल्जीने चित्तोडगढ जिंकले.

जन्म:

१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; नोबेल पारितोषिक विजेत्या, भारतरत्न.

१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ

मृत्यू:

१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक

*ऑगस्ट २७*

१९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान

जन्म:

१८५९-सर जमशेदजी टाटा

मृत्य:

१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक

*ऑगस्ट २८*

मृत्यू:

१७२९-सरखेल कान्होजी आंग्रे

१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.

२००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.

*ऑगस्ट २९*

जन्म:

१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

१९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.

१९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.

मृत्यू:

१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील  साहित्यिक.

१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.

१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.

*ऑगस्ट ३०*

१५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.

जन्म:

१९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.

१९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती.

१९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१७७३-नारायण पेशवे

*ऑगस्ट ३१*

१८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.

जन्म:

१५६९ - जहांगीर, मुघल सम्राट.

१८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.

१९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू.

१९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१९७३-ताराबाई मोडक

Thursday, July 21, 2022

सेतू अभ्यास उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका

 सेतू अभ्यास उत्तर चाचणी दिनांक:२५जुलै,२६ जुलै २०२

खालील लिंकला टच करा व सर्व वर्गांच्या उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका download करा

https://www.maa.ac.in/index.php?tcf=bridge_course2022_2023


खालील लिंकला टच करा व सर्व वर्गांच्या पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका download करा

https://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course22newmscert

द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu

    द्रौपदी मुर्मू  एक शिक्षिका ते देशाच्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. सर्वोच्च घटनात्मक पदासाठी संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. द्रौपदी मुर्मू या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथील आदिवासी नेत्या आहेत. द्रौपदी मुर्मू या एक मृदुभाषी नेत्या आहेत. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.

         कौटुंबिक माहिती

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.

द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी मुलगे मरण पावले आहेत

त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या.

शिक्षिका

त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.

           राजकीय प्रवास

मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.२०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे 

त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.

                   संकलन-श्री.नंदकुमार रेडेकर


Sunday, July 17, 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

जन्म दिनांक:१ ऑगस्ट,१९२० वाटेगाव ,ता.वाळवा.सांगली

मृत्यू दिनांक:१८ जुलै,१९६९ मुंबई

दीड दिवसांच्या शाळेत शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांची लेखनसंपदा


साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. साठेनी लिहिलेल्या फकिरा कादंबरीला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..

  1. अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
  2. अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
  3. अमृत
  4. आघात
  5. आबी (कथासंग्रह)
  6. आवडी (कादंबरी)
  7. इनामदार (नाटक, १९५८)
  8. कापऱ्या चोर (लोकनाट्य)
  9. कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
  10. खुळंवाडा (कथासंग्रह)
  11. गजाआड (कथासंग्रह)
  12. गुऱ्हाळ
  13. गुलाम (कादंबरी)
  14. चंदन (कादंबरी)
  15. चिखलातील कमळ (कादंबरी)
  16. चित्रा (कादंबरी, १९४५)
  17. चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
  18. नवती (कथासंग्रह)
  19. निखारा (कथासंग्रह)
  20. जिवंत काडतूस (कथासंग्रह)
  21. तारा
  22. देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
  23. पाझर (कादंबरी)
  24. पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
  25. पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
  26. पेंग्याचं लगीन (नाटक)
  27. फकिरा (कादंबरी, १९५९)
  28. फरारी (कथासंग्रह)
  29. मथुरा (कादंबरी)
  30. माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
  31. रत्ना (कादंबरी)
  32. रानगंगा (कादंबरी)
  33. रूपा (कादंबरी)
  34. बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
  35. बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
  36. माझी मुंबई (लोकनाट्य)
  37. मूक मिरवणूक(लोकनाट्य)
  38. रानबोका
  39. लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
  40. वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
  41. वैजयंता (कादंबरी)
  42. वैर (कादंबरी)
  43. शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
  • संघर्ष
  1. सुगंधा
  2. सुलतान (नाटक)

प्रवासवर्णन

  1. कविता आणि माझा रशियाचा प्रवास

काव्ये

  • अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या

          जीवनपरिचय
अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.
           राजकीय प्रवास

साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती.आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

संकलन:नंदकुमार रेडेकर जिल्हा परिषद शाळा आरल,पाटण सातारा