Tuesday, June 28, 2022

जुलै,दिनविशेष July Dinvishesh

जुलै,दिनविशेष

संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर शिक्षक जिल्हा परिषद शाळा आरल पुन.
*जुलै १*
महाराष्ट्र कृषी दिन
राष्ट्रीय पोस्टल / टपाल कामगार दिन
राष्ट्रीय डॉक्टर दिवस
भारतात वस्तू व सेवा कर लागू.
१९६१-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना
१९०९-मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीची हत्या केली.
१९६० - घानाच्या प्रजासत्ताकाची निर्मिती
जन्म:
१९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.

*जुलै २*
१९८३-अणुऊर्जा केंद्राची स्थापना
जन्म:
१८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
मृत्यू:
१९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.

*जुलै ३*
बेलारूसचा स्वातंत्र्यदिवस
१८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
मृत्यू:
१३५० - संत नामदेव, पंढरपूर येथे समाधिस्थ.

*जुलै ४*
अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस, फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस
जन्म:
१९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक.
मृत्यू:
१९०२ - स्वामी विवेकानंद
१९९९ - वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.

*जुलै ५*
महाराष्ट्र राज्य मतदाता दिवस
१९४३-आझाद हिंद सेना स्थापना
१९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

*जुलै ६*
जन्म:
१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
१८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
१९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
मृत्यू:
२००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.

*जुलै ७*
१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
जन्म:
१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.

*जुलै ८*
१४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
१९१० - क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
२०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.
जन्म:
१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
१९७२ - सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू.

*जुलै ९*
१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

*जुलै १०*
१८०० कोलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची थापना करण्यात आली
मातृ सुरक्षा दिन
जन्म:
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
१९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.

*जुलै ११*
जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन
इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.

*जुलै १२*
कागदी पिशवी दिवस
जन्म:
१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ
११२५-संत सावता माळी समाधी

*जुलै १३*
२०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.
जन्म:
१६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
१८९२ - केसरबाई केरकर, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका.
मृत्यू:
१६६०-बाजीप्रभू देशपांडे प्राणार्पण

*जुलै १४*
१९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
१९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.
जन्म:
१८५६-गोपाळ गणेश आगरकर
१९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री.
१९७१ - मधू सप्रे, भारतीय मॉडेल व १९९२ सालची फेमिना मिस इंडिया.

*जुलै १५*
जागतिक युवा कौशल्य दिन
१७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.
१८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.
जन्म:
१९०३ - के. कामराज, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
१९०४ - मोगूबाई कुर्डीकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका
मृत्यू:
१९६७-बालगंधर्व

*जुलै १६*
१९००-ऑलिम्पिक सामने पॅरिस येथे भरले.

*जुलै १७*
आंतरराष्ट्रीय न्याय दिन
जागतिक इमोजी दिवस
१८०२-मोडिलिपीतून प्रथम मुद्रण

*जुलै १८*
१९८०-रोहिणी उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण
१९६९ – अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन
*जुलै १९*
जन्मः
१९३८-जयंत विष्णू नारळीकर प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक.

*जुलै २०*
डाॅ. संजय मालपाणी महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ, गीता परिवार या बालसंस्काराचे देशव्यापी काम करणार्र्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म.

*जुलै २१*
१८७९-वासुदेव बळवंत फडके यांना अटक
१९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.
जन्म:
१९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.

*जुलै २२*
१९४७-तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती
जन्म:
१९२३ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक.
१९७० - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

*जुलै २३*
वनसंवर्धन दिवस
१९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.
१९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
जन्म:
१८५६ - लोकमान्य टिळक, भारतीय क्रांतीकारी.
१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
मृत्यू:
२००४ - मेहमूद, भारतीय अभिनेता.

*जुलै २४*
जन्म:
१९११-बासरीवादक पन्नालाल घोष

*जुलै २५*
राष्ट्रीय पालक दिन
१९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
१९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.

*जुलै २६*
कारगिल विजय दिन

*जुलै २७*
मृत्यू
१८४४-रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन

*जुलै २८*
सामाजिक आरोग्य दिन
१६८२-छ. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली.
१९१४-पहिल्या महायुद्धास सुरुवात

*जुलै २९*
जागतिक व्याघ्र दिन
जन्म:
१९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
मृत्यू:
१९९६-स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली

*जुलै३०*
मृत्यू:
महाकवी तुलसीदास-१६२३

*जुलै३१*
जन्म:
लेखक मुन्शी प्रेमचंद-१८८०

Monday, June 27, 2022

अग्निपथ योजना Join Indian Army


Join Indian Army : भारतीय सैन्यदलात जॉईन होण्याची संधी 
 आता नवीन अग्निपथ योजने (Agneepath Yojana) अंतर्गत भारतीय सैन्यात अग्नीवर(Agniveer ) म्हणून भरती होऊ शकतात 

 मानधन
या योजनेअंतर्गत अग्निवीरांना पहिल्या वर्षी महिन्याला 30 हजार रुपये वेतन मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन 33 हजार होईल.

 वय आणि शिक्षण
 अग्निपथ योजनेसाठी शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास आवश्यक आहे. या भरतीसाठी 17 वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

 निवृत्ती फंड 
अग्निवीरांना देण्यात येणाऱ्या पगारातून 30 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या फंडमध्ये जमा केली जाईल. या फंडामध्ये सरकारकडून आणखी 30 टक्के रक्कम जमा केली जाईल. सेवा काळ संपल्यानंतर दहा लाख चार हजार रूपये फंडाची रक्कम आणि त्यावरील व्याज कर्मचाऱ्याला मिळेल. यासोबतच जीवन विमा संरक्षण अग्निवीरांना त्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी 48 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल.
 
अधिक माहितीसाठी व ऑनलाइन निवेदन भरणेसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या👇


वरील वेबसाईटवर भेट द्या व सर्व माहिती पहा.

Saturday, June 18, 2022

इ. पहिली विद्याप्रवेश-निपुण भारत:२०२२/२३

 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका* Pdf डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकला टच करा.

https://shorturl.ae/sDxqe

इयत्ता पहिली विद्या प्रवेश :शाळापूर्व तयारी कार्यक्रम अंमलबजावणी मार्गदर्शक पत्र*

http://shorturl.at/ksGJK

विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका* Pdf copy डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकला टच करा.

https://shorturl.ae/gtO2L

इयत्ता पहिली *विद्याप्रवेश : शाळापूर्व तयारी कार्यक्रम उद्बोधन सत्र*  पाहण्यासाठी पुढील लिंकवर जावे.

https://youtu.be/VA9irGeUTmo

राजे शिवछत्रपती प्रश्नमंजुषा भाग:१८

 

Thursday, June 16, 2022

दहावी निकाल SSC BOARD RESULT

 इयत्ता दहावी निकाल MAHARASHTRA BOARD RESULT SSC

इयत्ता दहावी निकाल दिनांक १७ जून २०२२ दुपारी १ नंतर निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

www.mahresult.nic.in

SSC Board Result

mahahsscboard.in


Saturday, June 11, 2022

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार NATIONAL AWARDS TO TEACHERS 2022

 NATIONAL AWARDS TO TEACHERS 2022

अर्ज करण्यासाठी लिंक
(Home-Menu - log in-New Registration)

महत्वपूर्ण तारीख

  • 1 जून 2022 से 20 जून, 2022
    ऑनलाइन आवेदन आमंत्रित करने के लिए वेब-पोर्टल खोलना।
  • 1 जुलाई 2022 से 15 जुलाई, 2022
    जिला चयन समिति का नामांकन राज्य चयन समिति को ऑनलाइन पोर्टल के माध्यम से अग्रेषित करना।
  • 16 जुलाई 2022 से 30 जुलाई 2022
    राज्य चयन समिति की शार्टलिस्‍ट को ऑनलाइन पोर्टल के माध्यम से स्वतंत्र राष्ट्रीय जूरी को अग्रेषित करना

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारों के लिए मूल्यांकन मट्रिक्स

संलग्नक –I

श्रेणी क: वस्तुनिष्ठ मानदंड
क्रामांक संख्यामानदंडअधिकतम अंक/सीमा
1समुदाय,अभिभावकों,पूर्व छात्रों आदि को स्कूल को किसी भी प्रकार जैसे भौतिक अवसरंचना,कम्पयूटर,मध्यानह भोजन, धनराशि, पुस्तकें आदि द्वारा स्कूल में योगदान करने के लिए प्रोत्साहित करने के लिए शिक्षक द्वारा किया गया कार्य .3
2पिछले 5 वर्ष में प्रकाशन(शोध पत्र/अंतर्राष्ट्रीय/राष्ट्रीय पत्रिकाओं में लेख(आईएसएसएन के साथ), पुस्तकें(आईएसबीएन के साथ),आदि)3
3पिछले 3 वर्षों के वार्षिक निष्पादन मूल्यांकन रिपोर्ट या अन्य निष्पादन मूल्यांकन लिखत3
4क्या शिक्षक बिना किसी शिकायत के नियमित रूप से स्कूल आ रहा है?3
5क्या शिक्षक भेजे गए सेवाकालीन प्रशिक्षण में नियमित रूप से उपस्थित होता है?2
6नामांकन बढ़ाने और ड्रॉप आउट कम करने में शिक्षक द्वारा किया गया कार्य .2
7क्या शिक्षक को स्वयं या किसी अन्य मूक प्लैटफ़ार्म के अधीन किसी पाठ्यक्रम के लिए नामांकित किया गया है?2
8ई सामग्री,पाठ्यपुस्तक,एससीईआरटी, बोर्ड या एनसीईआरटी के लिए शिक्षक हैंडबुक2
उप-योग20
  
श्रेणी ख : निष्पादन पर आधारित मानदंड (केवल निर्देशात्मक व उदाहरणात्मक)
क्रामांक संख्यामानदंडअधिकतम अंक
1शिक्षक द्वारा किए गए नवाचारी प्रयोग(जैसे आईसीटी का उपयोग,रुचिपुर्ण अधिगम तकनीकें) जिनका छात्रों पर अधिक प्रभाव पड़ा हो। शिक्षण अधिगम सामग्री,किफ़ायती शिक्षण उपकरण आदि सहित प्रतिदिन के शिक्षण कार्यकलापों में समुचित शिक्षा विधि का विकास और उपयोग। (नवाचार/प्रयोगों की संख्या, पैमाने और प्रभाव के आधार पर )30
2पाठ्येतर और सह पाठ्यक्रम कार्यकलापों का आयोजन(प्रयोगों की संख्या,पैमाने और प्रभाव के आधार पर))25
3क) स्कूल अवस्थापना और बच्चों के बीच सामाजिक जागरूकता के प्रसार के लिए समाज को एकजुट करना .
ख) राष्ट्र निर्माण और राष्ट्रीय अखंडता का संवर्धन
25
उप-योग80
कुल योग100



शिक्षक पुरस्कारों हेतु शिक्षकों की पात्रता की शर्तें

  • i) निम्नलिखित श्रेणियों के तहत मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्‍यमिक/उच्च/उच्चतर माध्यमिक विद्यालयों में काम करने वाले स्कूल शिक्षक और स्कूलों के प्रमुख:
  • क) राज्य सरकार/संघ राज्‍यक्षेत्र प्रशासन द्वारा संचालित स्कूल, स्थानीय निकायों द्वारा संचालित स्कूल, राज्य सरकार/संघ राज्‍यक्षेत्र प्रशासन द्वारा सहायता प्राप्त स्कूल।
  • ख) केन्द्रीय सरकार के स्कूल अर्थात केंद्रीय विद्यालय (केवीएस), जवाहर नवोदय विद्यालय (जेएनवी), रक्षा मंत्रालय (एमओडी) द्वारा संचालित सैनिक स्‍कूल, परमाणु ऊर्जा शिक्षा सोसाइटी (एईईएस) द्वारा संचालित स्कूल।
  • ग) केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) से संबद्ध स्कूल (उपर्युक्‍त (क) और (ख) के अलावा)।
  • घ) काउंसिल फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेट एग्जामिनेशन (सीआईएससीई) से संबद्ध स्कूल (उपर्युक्‍त (क), (ख) और (ग) के अलावा)।
  • ii) सामान्य रूप से, सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार के लिए पात्र नहीं होते हैं, लेकिन उन शिक्षकों पर विचार किया जा सकता है जिन्‍होंने कैलेंडर वर्ष के एक भाग (कम से कम चार महीने अर्थात 30 अप्रैल तक, जिस वर्ष से राष्ट्रीय पुरस्कार से संबंधित हैं) तक कार्य किया हो, यदि वे अन्य सभी शर्तों को पूरा करते हैं ।
  • iii) शैक्षिक प्रशासक, शिक्षा निरीक्षक, और प्रशिक्षण संस्‍थान के कर्मचारी इन पुरस्कारों के लिए पात्र नहीं हैं।
  • iv) शिक्षक/मुख्‍याध्‍यापक को ट्यूशनों में शामिल नहीं होना चाहिए।
  • v) केवल नियमित शिक्षक और विद्यालय प्रमुख ही पात्र होंगे।
  • vi) संविदा शिक्षक और शिक्षामित्र पात्र नहीं होंगे।

Thursday, June 9, 2022

राजे शिवछत्रपती प्रश्नमंजुषा भाजप:१७

 

बदली पोर्टल सर्व व्हिडिओ

  शिक्षक बदली सर्व मार्गदर्शक व्हिडिओ 

पाहण्यासाठी पुढील you tube लिंक ओपन करा.

https://youtube.com/playlist?list=PLw-IhvMBtu92AZrAaZKJaCYe1jRHQbgdW

शिक्षक online बदली प्रक्रिया website adress लिंक

https://ott.mahardd.in/

Tuesday, June 7, 2022

प्रदीप भिडे-दूरदर्शनचे वृत्तनिवेदक यांचे निधन

 

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आज दि.७ जून रोजी निधन झाले.सुरुवातीपासून आपण ज्यांच्या आवाजातून दैनंदिन घडामोडी पाहत मोठे झालो, असे प्रदीप भिडे गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग समजली, त्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

                   मुलाखत:सौ. अनघा दिघे

दूरदर्शन, मुंबई येथे वृत्तविभागामधे अनुवादक, ‘प्रौढ साक्षरता’ मालिकांमधून अभिनय निर्मिती साहाय्यक, दूरदर्शन केंद्र, मुंबई वृत्त-निवेदन : १९७४ पासून सुरवात कामगार विश्व, योगविषयक मालिकांची निर्मिती ई मर्क या जर्मन कंपनीत जनसंपर्क अधिकारी, १९७८ हिंदुस्थान लिव्हर्स : वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, १९८० मुंबई, खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना : १९९४ डिजीटल साउंड सिस्टीमच्या साहाय्याने ध्वनीमुद्रण, कम्प्यूटर सिस्टिम मार्फत डबिंग, पहिल्या पाच स्टुडिओपैकी एक कॉर्पोरेट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्सची निर्मिती व दिग्दर्शन.

लोकांना कुठे काय चाललंय हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. प्रसार माध्यमांचं माहात्त्म्य दिवसेंदिवस वाढत आहे. सूत्र-संचालन, वृत्तनिवेदन ह्या व्यवसायांना देखील एक वलंय प्राप्त झालं आहे. श्री. प्रदीप भिडे हे, ह्या व्यवसायामधे गेली २५ वर्षे सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्याशी मनमोकळी बातचीत करण्याचा योग आला. खार येथील त्यांच्या ‘प्रियंका स्टुडिओ’मधे ही बातचीत झाली. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरवात २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाली. श्री. प्रदीप भिडे हे एप्रिल १९७४ पासून दूरदर्शनमधे दाखल झाले. स्व. भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्व. स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक. त्या काळात मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजीमधूनही बातम्या दिल्या जात. १९८४ पासून, जेव्हा नॅशनल नेटवर्क सुरू झाले, तेंव्हापासून, हिंदी व इंग्रजी बातम्या दिल्लीहून प्रसारीत केल्या जाऊ लागल्या. वयाच्या २१ व्या वर्षी श्री. भिडे यांनी बातम्या द्यायला सुरवात केली दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रूची होती. प्रसार माध्यमात करियर सुरू करावं असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.

एका चांगल्या वृत्तनिवेदकाला आवाजाबरोबरच भाषेवर प्रभुत्त्व मिळविणे जरूरी ठरते. संस्कृत भाषा ही मृत भाषा मानण्याचा प्रघात असला तरी, संस्कृतमधील श्लोक पठण, उच्चारण यामुळे वाणी स्पष्ट होते. शब्दाचा उच्चार कसा करायचा असतो, मोठा शब्द बोलताना, कुठे तोडायचा असतो, हे भाषिक बारकावे आत्मसात करणे श्रेयस्कर. अर्थाप्रमाणे विराम घेऊन शब्दफेक करता आली पाहिजे, असे सांगून श्री. भिडे यांनी ‘बातमी सादर करताना, सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते, यासाठी शब्दभांडार हवे. बालसुलभ कुतूहल हवे. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव निर्माण करून सादर केल्या तर त्या परिणामकारक होतात ‘ अशी माहिती दिली.

श्री. भिडे यांच्या पिढीपेक्षा हल्लीच्या निवेदकांना जास्त संधी उपलब्ध आहेत. श्री. सुरेश खरे हे सूत्र-संचालन व निवेदन या विषयावर वर्कशॉप्स घेतात. पुण्यामधे रंगा गोडबोले, अजित भुरे यांसारखे लोक ह्या क्षेत्रातील ट्रेनिगसाठी कार्य करीत आहेत.

तुम्ही अशा प्रकारची वर्कशॉप्स का घेत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना, श्री. भिडे म्हणाले, येणारे शिबिरार्थी उमेद घेऊन येतात. त्यांना आयोजकांकडून ‘जॉब’ची खात्री हवी असते. अशा लोकांना फसवणूक केल्यासारखं वाटू शकतं. निवेदन, बोलण्या-चालण्यातील कौशल्य हा व्यक्तित्त्व विकासाचा एक भाग म्हणून लोकांनी त्याकडे पाहिलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर, मराठी वर्ल्डसमवेत, ‘व्हॉईस कल्चर’वर वर्कशॉप्स घेण्याची श्री. प्रदीप भिडे यांची मनापासून तयारी असल्याचं दिसलं.

व्हॉईस कल्चर व यशस्वी निवेदक म्हणून काम करताना, योगातील क्रियांचा उपयोग होतो, असं मत व्यक्त करताना श्री. भिडे यांनी असं संगितलं की त्यांनी व्यक्तीश: तसे खास प्रयत्न केले नाहीत. ते शाकाहारी असून, सिग्रेट वा तत्सम व्यसन त्यांना नाही, तसेच तेलकट पदार्थ खाण्याची मूळातच आवड नाही, त्यामुळे आपसूकच आवाज टिकून राहिला. गेली २५ वर्षे दूरदर्शनवरून त्यांनी वृत्तनिवेदन केलं. पण तरीही ते अजून थकलेले नाहीत, की श्रोते वा प्रेक्षक त्यांना कंटाळले नाहीत.

Pradeep Bhideशाळा-कॉलेजच्या दिवसांतील मराठीच्या ओढीमुळे अनेक कादंब-या व इतर पुस्तके त्यांनी वाचली. त्या बहुश्रुततेचा त्यांना सदैव फायदाच झाला. कायमची व्यक्त होणारी रड असली, तरी आज वाचन-संस्कृती निकालात निघाली आहे, ही वस्तुस्थिती आहे, व त्याबाबतची खंत त्यांनी व्यक्त केली. नाटकांमधून कामं करताना, ते रत्नाकर मतकरी, रवी पटवर्धन यांच्या संपर्कात आले. त्यांच्या निवेदनातील कारकिर्दीचा एक ‘बेस’ आपसूकच तयार होत होता. दूरदर्शनच्या त्या वेळच्या संचालकांच्या, श्री. शास्त्रींच्या प्रोत्साहनामुळे, ते बातम्यांच्या अनुवादाबरोबरच इतरही कामात रस घेऊ लागले. प्रौढ साक्षरतेच्या विषयावरील एका मालिकेमधे, ३२ ते ३३ भाग त्यांनी शिक्षकाची भूमिका वठविली. हळुहळू ‘निर्मिती साहाय्यक’ म्हणून ते काम करू लागले. श्री. शास्त्री तसेच त्यांच्या नंतरच्या श्री. ल गो. भागवत या दोन्हीही दूरदर्शनच्या संचालकांकडून खूप शिकायला मिळालं. एकीकडे निर्मिती साहाय्यक म्हणून काम पाहात असतानाच वृत्तनिवेदन देखील सुरू होते. कार्यक्रम निर्मिती करताना, पाल्हाळ न लावता अचूक वेध घेऊन प्रभावीपणे घटना सादर करणं महत्त्वाचं. नेटकेपणा, वेळच्या वेळी काम आणि शिस्त या सा-या गोष्टी महत्त्वाच्या. व्यवस्थापनविषयक सर्व कार्यक्रम संकलित करणे, असे कार्यक्रम इंग्रजीमधून असल्यामुळे इंग्रजी व हिंदी बातम्यांसाठी काम करणे, मुलाखत घेणे, बाह्य-चित्रीकरण, या सा-यातून लघुपट तयार करण्याची कला भिडे यांनी आत्मसात केली. ‘कामगार विश्व’, त्यातून निरनिराळया उद्योग समूहांच्या व्यवस्थापनाशी संपर्क, सदाशिवराव निंबाळकर यांची योगविषयक मालिका, यातून कसकसा विकास झाला, याची माहिती ते देत राहिले.

बातम्या देण्यातलं थ्रिल मोठं आहे. एकंदर २५ वर्षांच्या बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग श्री. भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण बॉम्बस्फोट, अशा घटनांची बातमीपत्रे श्री. भिडे यांनीच वाचली. निवेदकाने अशा वेळी भावनाविवश होता कामा नये. त्रयस्थाच्या भूमिकेतून तटस्थ राहून बातम्या सादर करणे आवश्यक. निवेदकाला व्यक्तीश: आनंद झाला वा दु:ख झाले तरी त्याला भावनांचे प्रदर्शन करता येत नाही. अलिप्तपणा म्हणजे कोरडेपणा नव्हे. आवश्यक त्या भावभावनांतून भिजलेली बातमी लोकांच्या कानावर पडायला हवी.

२१ मे १९९१, भारतात श्रीपेरूंबदूर येथे ‘राजीव’जींची हत्त्या झाली. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, म्हणून सांगितलं. ही बातमी मुंबईत वा-यासारखी पसरली होती. मुंबई बंद. सर्वत्र स्मशान शांतता. पोलिसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी ६.३० वाजता त्यांनी बातमी वाचली. तटस्थपणे बातमी वाचताना देखील अगदी नकळतपणे तिला एक कारूण्याची झालर होती. ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया त्यांना बातमी झाल्या झाल्या लगेचच मिळाल्या. १९९४ चा बॉम्बस्फोट झाल्यावर त्या दिवशी साडेसात वाजता बातम्या देण्याची जबाबदारी भिडे यांची होती. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच निघाले. रेल्वेने, पायी पायी असा प्रवास (अंधेरी ते वरळी) त्यांनी केला व सायंकाळी ५ वाजता पोहोचले. बातमी परिणामकारक रित्या सादर केली. त्याही परिस्थितीमधे लोकांनी त्यांच्या अचूक वृत्तनिवेदनाला दाद दिली.

पुण्यात होणा-या मातृपूजनाची बातमी मिळवून आपणहून सादर केली. सहा पिढयांपैकी पहिली आजीबाई ८५ वर्षांची तर, सहाव्या पिढीची तिची प्रतिनिधी ६ महिन्यांची ! या सचित्र बातमीचे सा-या महाराष्ट्रामधे कौतुक झाले. या बरोबरच क्वचितप्रसंगी मिलीमिटर व्यासा ऐवजी किलोमीटर व्यासाची पाईप लाईन असे गफलतीचे उल्लेखही झाल्याचे त्यांनी हसत हसत सांगितले. महमद रफी यांच्या निधनाच्या बातमीला देखील कारूण्याची छटा होती. भिडे यांनी ही बातमी सादर केली, तेव्हाही त्याला अशीच दाद मिळाली. नाटयपूर्ण वाटणार नाही, आनंद वा दु:खाचं प्रदर्शन वाटणार नाही, आणि तरीही ती बातमी रूक्ष वाटणार नाही, याचं अवधान निवेदाकाला ठेवावं लागतं.

यानंतर १९७८ साली ते ई. मर्क या जर्मन कंपनीमधे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काम पाहू लागले. दोन वर्षांनी त्यांनी हिंदुस्थान लिव्हर्समधे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. देश-विदेश दौरे, एकटयाच्या जबाबदारीवर अनेक अवघड काम पार पाडणे, हे सारे करताना देखील वृत्तनिवेदन सुरू राहिलं होतं.

Pradeep Bhideहा नंतर स्वीकारलेला व्यवसाय, पहिल्या व्यवसायाशी सुसंगत होता काय, यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ग्राहकांच्या किंवा लोकांच्या कंपनीच्या उत्पादनांविषयी निरनिराळया तक्रारी वा अडचणी असू शकतात. पाच वर्षातील कंपनीच्या प्रकल्पांची माहिती, प्रॉडक्ट लॉचिंगची माहिती, कंपनीची मिल्क कोऑपरेटिव्ह, किंवा, फास्ट मुव्हींग कंपनी असल्यामुळे प्रसार-माध्यमांना कंपनीची भूमिका वेळोवेळी समजावून सांगणं – जनसंपर्क अधिकारी हा फिक्सर आहे -, असं लोकांना वाटतं, व ते खरं देखील असतं. त्यामुळे वृत्तनिवेदन, आणि जनसंपर्क ही आपली दोन्हीही कामं परस्पर-पूरकच होती, असा खुलासा भिडे यांनी केला. जनसंपर्क अधिकारी असताना, भिडे यांचा देशविदेशच्या बडया मंडळींशी, पत्रकारांशी, नामवंतांशी संपर्क आला. सृजनशीलता वाढीस लागली. त्याचा परिपाक म्हणजे, स्वत:चं काहीतरी वेगळं करावं, स्वतंत्र व्यवसाय करावा, हा निर्णय त्यांनी घेतला. आपल्या कन्येच्या नावानं, त्यांनी ‘प्रियंका स्टुडिओ’ सुरू केला. हा डिजिटल साऊंड सिस्टीमचा स्टुडिओ असून, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण आहे. कॉम्प्यूटर पध्दतीने येथे ध्वनीमुद्रणाची सोय असून, निरनिराळया साऊंड ट्रॅक्सचं मिक्सींग येथून करतात आणि हवा तसा ‘इम्पॅक्ट’ मिळवतात. फिल्म निर्माते, जाहीरात निर्माते इथे बुकिंग करून, आपापले रेकॉर्डिंग करून घेतात.

या अनुशंगाने कॅसेट कंपन्याच्या परिस्थितीविषयी विचारले असता, श्री. प्रदीप भिडे यांनी, म्युझिक उद्योजकांवर फार गंभीर परिस्थिती आली आहे, असे सांगितले. कॅसेटची जागा सी. डी. ने घेतली असून, त्यातदेखील एम्. पी. थ्री अशी व्हर्जन्स येत आहेत. या नाविन्यावर काहीही उपाय नाही, ते अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले. असं असलं तरी, रेकॉर्डिंग स्टुडिओमधे लोक येतच राहतात. सतत काही ना काही प्रॉजेक्ट तिथे सुरू असतो. श्री. भिडे स्वत:देखील निरनिराळया कॉर्पोरेट फिल्म्स बनवितात. कॉर्पोरेट फिल्म्स बनवताना, संकल्पना त्यांची असते. ध्वनीमुद्रण अर्थातच त्यांच्या स्टुडिओमधे होतं, परंतु कॅमेरा व इतर जरूरी ते तंत्रज्ञ ते मागवून घेतात.

एक परिचित चेहरा असल्यामुळे खासगी आयुष्यात अडचणी येतात का?, याबाबत त्यांनी नकारात्म उत्तर दिलं. अगदी सहज हवा तिथे वडापाव खाणं, वा पर्यटन करणं, अशा कुठल्याही गोष्टी ते मनमोकळेपणे करतात. लोकसंग्रह करण्याची त्यांची आवड असल्याने, त्यांना कधीही प्रसिध्दीचा बाऊ वाटला नाही. कुलू मनालीच्या त्यांच्या सफरीच्या दरम्यान एक अध्यात्मिक गुरू भेटले होते, त्याची आठवण देखील त्यांनी सांगितली.

लघुपट बनविताना, दिवसरात्र काम करून तो लघुपट एअरवर जाईपर्यंत प्रचंड धावपळ असते. प्रत्येक व्यवसायाच्या स्वत:च्या अशा गरजा असतात. व त्या पुरवता पुरवता, आपण यशाचं एक जाळं विणू शकतो. या सर्व प्रवासात कुठेही चिंता वा दबाव न जाणवण्याचं, अपयशाचं भय न वाटण्याचं संपूर्ण श्रेय ते आपली पत्नी सुजाता हिची उत्तम साथ, व नेहमीच भावबळ वाढविणारे अक्षय आणि प्रियंका ही मुलं यांना प्रांजळपणानं देतात.

प्रसारमाध्यमांविषयी मनमोकळी चर्चा करताना, टि. व्ही. मालिका ही रोज घरात येणा-या वर्तमानपत्राप्रमाणं असते. तर चित्रपटाला त्यापेक्षा जास्त ‘सेल्फ लाईफ’ असतं असं ते म्हणाले. चांगला चित्रपट स्मरणात राहतो. पुन्हा पाहाता येतो. हल्ली भारंभार मालिका झाल्या असून, तेच तेच लोक काम करताना दिसतात. तेच तेच सीन व तीच तीच स्थित्यंतरं दिसत राहतात. एकंदरच हल्ली ‘एंटरटेनमेंट’ प्रचंड वाढली आहे, असे श्री. भिडे म्हणाले. तेहलका.कॉम हा स्टंट होता का, याविषयी आपलं मत व्यक्त करताना श्री. भिडे म्हणाले, गोष्टी का उजेडात आल्या, हा भाग तूर्त बाजूला ठेवला तरी, शस्त्रांस्त्रांच्या खरेदीमधे भ्रष्टाचार होतो, ही चूकच आहे. आपला देश भ्रष्टाचारामधे फार वरच्या क्रमांकावर आहे. जोवर हया भ्रष्टाचाराचा समूळ नाश होत नाही, तोवर, आपला देश पुढे येणं फार कठीण आहे. डॉ. नारळीकरांसारख्या माणसांनी मंत्री होणं ही काळाची खरी गरज आहे, पण अशी कुठलीही सोय आपल्या राजनीतीमधे नाही.

नवीन पिढीचं भवितव्य काय? यावर भाकित सांगताना ते म्हणाले, नव्या पिढीसमोर पहिल्या मानाने जास्त आव्हानं आहेत. राजकीय परिस्थिती समाधानकारक नाही. ‘ब्रेन ड्रेन’ झाला आहे. शेवटी लोक जे ‘डिझर्व्ह’ करतात, ते सरकार लोकांना मिळतं.
बदलत्या सामाजिक वास्तवातून भाषिक अंतराय देखील वाढतो आहे. मराठीतील उच्च मध्यमवर्गीय इंग्रजी माध्यामाच्या आस-याने वावरतो आहे. झोपडपट्टीतील पालक मराठीची निवड करतात. वेळोवळी ज्या ज्या बोली लोक बोलतील त्या मराठीला स्वीकाराव्या लागतील. निरनिराळे आघात पचवत, रिचवत, पण तरीही मराठी पुढेच जाईल. मराठी व इंग्रजी मिळून मिंग्लीश, आणि हिंदीच्या संपर्कात इंग्रजी येऊन हिंग्लिश अशी भाषिक रूपे स्वीकारावी लागतील. कॅसेट व्यवसायाचं भवितव्य अंधारात असल्यामुळे, नवीन गीतकार व संगीतकारांना आता वावच राहिला नाही. पण तरीही मी आशावादी आहे. नवीन पिढी म्हणजे, नवे उत्साहाचे झरे. त्यांना नवे मार्ग शोधावे लागतील. चोखाळावे लागतील. कदाचित त्यातूनच नवनवे कलाप्रकार जन्म घेतील. २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक स्थित्यंतरं त्यांनी पाहिली व त्यामधूनच माणसं ‘वाचण्याचं’त्यांचं कसब, समाजाची नस शोधण्याची अभ्यासू वृत्ती ही सतत जाणवत राहिली.

‘फोडीले हे भांडार, धन्याचा हा माल । मी तो हमाल भार वाही ॥’ – एका वेगळया संदर्भात ज्ञानेशाच्या या ओवीचा प्रत्यय अनेक वर्षे श्री. प्रदीप भिडे घेत होते, व आहेत, आणि त्यातूनच वृत्त निवेदनासारख्या क्षेत्रामधे देखील भार वाहता, वाहता, कित्येक प्रकारचे अक्षय ज्ञानकण कसे साठवता येतात, कल्पनांच्या कित्येक कोटी कशा हाताशी लागतात, याचा एक दाखला श्री. प्रदीप भिडे यांच्या भेटीमधून गवसला

मुलाखत व शब्दांकन – सौ अनघा दिघे

Wednesday, June 1, 2022

जून२०२२,दिनविशेष

 *दिनविशेष-जून,२०२२*

संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा आरल पुन.ता.पाटन ९४०४९६८२१६

*१ जून*

१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.

१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.

मृत्यू:

१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.

१९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.

१९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.


*२ जून*

२०१४-तेलंगन भारताचे  एकोणतीसावे राज्य झाले.

जन्म:

१९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .

मृत्यू:

१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.


*३ जून*

१८१८-मराठेशाहीचा अस्त

१९१६-महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले.

जन्म:

१८९० - बाबूराव पेंटर, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.

१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.

मृत्यू:

२००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.


*४ जून*

राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन

१६७४-राज्याभिषेकापूर्वी छ. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली

मृत्यू:

१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.

१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्‍ज्ञ, शिक्षणतज्‍ज्ञ.

१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.


*५ जून*

जागतिक पर्यावरण दिन

जन्म:

१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.

मृत्यू:

१९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्‍ज्ञ.


*६ जून*

१६७४-छ. शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक

जन्म:

१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.

१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.

मृत्यू:

२००२ - शांता शेळके, मराठी कवयित्री


*७ जून*

मृत्यू:

१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.

१९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.

२००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.


*८ जून*

१६७०-पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला परत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.

जागतिक महासागर दिन

जन्म:

१९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.

१९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार


*९ जून*

१६६५-पुरंदरचा तह झाला.

मृत्यू:

१९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक


*१० जून*

जन्म:

१९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.

१९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.


*११ जून*

मृत्यू:

१९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.

१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक


*१२ जून*

मृत्यू:

१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.

१९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.

२००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.


*१३ जून*

जन्म:

१८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

मृत्यू:

१९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.


*१४ जून*

जन्म:

१३९८ - संत कबीर.

मृत्यू:

१९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक


*१५ जून*

जन्म:

१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.

१९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.

मृत्यू:

१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.


*१६ जून*

१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई

मृत्यू:

१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.


*१७ जून*

मृत्यू:

१६७४-राजमाता जिजाबाई.

१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.

१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.


*१८ जून*

मृत्यू:

१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.

१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.


*१९ जून*

जन्म:

१९४७ - सलमान रश्दी, ब्रिटिश लेखक.

१९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.


*२० जून*

जन्म:

१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक


*२१ जून*

आंतरराष्ट्रीय योग दिवस; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.

जन्म:

१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.


*२२ जून*

१८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.

जन्म:

१८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.


*२३ जून*

१९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.

मृत्यू:

१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्‍ज्ञ.


*२४ जून*

१९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला


*२५ जून*

 मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस.

१९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.

१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.


*२६ जून*

जन्म:

१८७४ - शाहू महाराज 

१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.

१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.

मृत्यू:

१९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

२००१ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.


*२७ जून*

जन्म:

१८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.

मृत्यू:

१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.

२००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.


*२८ जून*

१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची सारायेव्होमध्ये हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरूवात.

१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.

जन्म:

१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.


*२९ जून*

जन्म:

१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.

१९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.


*३० जून*

१९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.

मृत्यू:

१९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.

१९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

१९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.