Wednesday, June 1, 2022

जून२०२२,दिनविशेष

 *दिनविशेष-जून,२०२२*

संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा आरल पुन.ता.पाटन ९४०४९६८२१६

*१ जून*

१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.

१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.

मृत्यू:

१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.

१९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.

१९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.


*२ जून*

२०१४-तेलंगन भारताचे  एकोणतीसावे राज्य झाले.

जन्म:

१९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .

मृत्यू:

१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.


*३ जून*

१८१८-मराठेशाहीचा अस्त

१९१६-महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले.

जन्म:

१८९० - बाबूराव पेंटर, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.

१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.

मृत्यू:

२००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.


*४ जून*

राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन

१६७४-राज्याभिषेकापूर्वी छ. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली

मृत्यू:

१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.

१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्‍ज्ञ, शिक्षणतज्‍ज्ञ.

१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.


*५ जून*

जागतिक पर्यावरण दिन

जन्म:

१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.

मृत्यू:

१९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्‍ज्ञ.


*६ जून*

१६७४-छ. शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक

जन्म:

१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.

१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.

मृत्यू:

२००२ - शांता शेळके, मराठी कवयित्री


*७ जून*

मृत्यू:

१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.

१९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.

२००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.


*८ जून*

१६७०-पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला परत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.

जागतिक महासागर दिन

जन्म:

१९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.

१९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार


*९ जून*

१६६५-पुरंदरचा तह झाला.

मृत्यू:

१९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक


*१० जून*

जन्म:

१९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.

१९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.


*११ जून*

मृत्यू:

१९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.

१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक


*१२ जून*

मृत्यू:

१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.

१९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.

२००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.


*१३ जून*

जन्म:

१८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

मृत्यू:

१९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.


*१४ जून*

जन्म:

१३९८ - संत कबीर.

मृत्यू:

१९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक


*१५ जून*

जन्म:

१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.

१९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.

मृत्यू:

१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.


*१६ जून*

१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई

मृत्यू:

१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.


*१७ जून*

मृत्यू:

१६७४-राजमाता जिजाबाई.

१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.

१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.


*१८ जून*

मृत्यू:

१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.

१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.


*१९ जून*

जन्म:

१९४७ - सलमान रश्दी, ब्रिटिश लेखक.

१९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.


*२० जून*

जन्म:

१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक


*२१ जून*

आंतरराष्ट्रीय योग दिवस; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.

जन्म:

१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.


*२२ जून*

१८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.

जन्म:

१८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.


*२३ जून*

१९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.

मृत्यू:

१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्‍ज्ञ.


*२४ जून*

१९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला


*२५ जून*

 मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस.

१९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.

१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.


*२६ जून*

जन्म:

१८७४ - शाहू महाराज 

१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.

१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.

मृत्यू:

१९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

२००१ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.


*२७ जून*

जन्म:

१८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.

मृत्यू:

१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.

२००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.


*२८ जून*

१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची सारायेव्होमध्ये हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरूवात.

१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.

जन्म:

१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.


*२९ जून*

जन्म:

१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.

१९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.


*३० जून*

१९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.

मृत्यू:

१९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.

१९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

१९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.

No comments:

Post a Comment