Tuesday, June 28, 2022

जुलै,दिनविशेष July Dinvishesh

जुलै,दिनविशेष

संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर शिक्षक जिल्हा परिषद शाळा आरल पुन.
*जुलै १*
महाराष्ट्र कृषी दिन
राष्ट्रीय पोस्टल / टपाल कामगार दिन
राष्ट्रीय डॉक्टर दिवस
भारतात वस्तू व सेवा कर लागू.
१९६१-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना
१९०९-मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीची हत्या केली.
१९६० - घानाच्या प्रजासत्ताकाची निर्मिती
जन्म:
१९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.

*जुलै २*
१९८३-अणुऊर्जा केंद्राची स्थापना
जन्म:
१८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
मृत्यू:
१९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.

*जुलै ३*
बेलारूसचा स्वातंत्र्यदिवस
१८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
मृत्यू:
१३५० - संत नामदेव, पंढरपूर येथे समाधिस्थ.

*जुलै ४*
अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस, फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस
जन्म:
१९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक.
मृत्यू:
१९०२ - स्वामी विवेकानंद
१९९९ - वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.

*जुलै ५*
महाराष्ट्र राज्य मतदाता दिवस
१९४३-आझाद हिंद सेना स्थापना
१९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

*जुलै ६*
जन्म:
१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
१८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
१९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
मृत्यू:
२००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.

*जुलै ७*
१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
जन्म:
१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.

*जुलै ८*
१४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
१९१० - क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
२०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.
जन्म:
१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
१९७२ - सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू.

*जुलै ९*
१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

*जुलै १०*
१८०० कोलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची थापना करण्यात आली
मातृ सुरक्षा दिन
जन्म:
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
१९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.

*जुलै ११*
जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन
इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.

*जुलै १२*
कागदी पिशवी दिवस
जन्म:
१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ
११२५-संत सावता माळी समाधी

*जुलै १३*
२०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.
जन्म:
१६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
१८९२ - केसरबाई केरकर, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका.
मृत्यू:
१६६०-बाजीप्रभू देशपांडे प्राणार्पण

*जुलै १४*
१९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
१९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.
जन्म:
१८५६-गोपाळ गणेश आगरकर
१९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री.
१९७१ - मधू सप्रे, भारतीय मॉडेल व १९९२ सालची फेमिना मिस इंडिया.

*जुलै १५*
जागतिक युवा कौशल्य दिन
१७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.
१८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.
जन्म:
१९०३ - के. कामराज, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
१९०४ - मोगूबाई कुर्डीकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका
मृत्यू:
१९६७-बालगंधर्व

*जुलै १६*
१९००-ऑलिम्पिक सामने पॅरिस येथे भरले.

*जुलै १७*
आंतरराष्ट्रीय न्याय दिन
जागतिक इमोजी दिवस
१८०२-मोडिलिपीतून प्रथम मुद्रण

*जुलै १८*
१९८०-रोहिणी उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण
१९६९ – अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन
*जुलै १९*
जन्मः
१९३८-जयंत विष्णू नारळीकर प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक.

*जुलै २०*
डाॅ. संजय मालपाणी महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ, गीता परिवार या बालसंस्काराचे देशव्यापी काम करणार्र्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म.

*जुलै २१*
१८७९-वासुदेव बळवंत फडके यांना अटक
१९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.
जन्म:
१९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.

*जुलै २२*
१९४७-तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती
जन्म:
१९२३ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक.
१९७० - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

*जुलै २३*
वनसंवर्धन दिवस
१९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.
१९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
जन्म:
१८५६ - लोकमान्य टिळक, भारतीय क्रांतीकारी.
१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
मृत्यू:
२००४ - मेहमूद, भारतीय अभिनेता.

*जुलै २४*
जन्म:
१९११-बासरीवादक पन्नालाल घोष

*जुलै २५*
राष्ट्रीय पालक दिन
१९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
१९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.

*जुलै २६*
कारगिल विजय दिन

*जुलै २७*
मृत्यू
१८४४-रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन

*जुलै २८*
सामाजिक आरोग्य दिन
१६८२-छ. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली.
१९१४-पहिल्या महायुद्धास सुरुवात

*जुलै २९*
जागतिक व्याघ्र दिन
जन्म:
१९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
मृत्यू:
१९९६-स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली

*जुलै३०*
मृत्यू:
महाकवी तुलसीदास-१६२३

*जुलै३१*
जन्म:
लेखक मुन्शी प्रेमचंद-१८८०

No comments:

Post a Comment