Saturday, December 3, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr.Babasaheb Ambedkar

 


Dr. Babasaheb Ambedkar :


मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.


मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

डॉ. बाबासाहेबांच्या कारकिर्दितील अनेक विधानं समाज परिवर्तनास कारणीभूत ठरली. त्यांच्या भाषणातून व लेखनातून आलेली महत्वपूर्ण विधाने,विचार :

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल


शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही


शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. (नागपुर, २९ जुलै १९४२)



तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.(कोलकत्ता, २४ ऑगस्ट १९४४)


आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.(मुंबई, ३ जून १९५३)


आपण सर्वप्रथमही भारतीय आहोत आणि अंतिमत:ही भारतीय आहोत


या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. (लक्षात ठेवा), जे झगडतात तेच पुढे येतात.(मुंबई, फेब्रुवारी १९३३)


माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. 


“शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.”


व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.


जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.


मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते


मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो


हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो


नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा


 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा


आयुष्य मोठं नाही तर महान असावं


 माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे


सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे 


कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. (मनमाड, १६ जानेवारी १९४९)


व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय


शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे



मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे (कोल्हापूर, २४ डिसेंबर १९५२)


आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे.  (मनमाड, ९ डिसेंबर १९४५)


ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो


डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके (List of books written by Ambedkar in Marathi):

क्रम संख्या पुस्तकाचे नाव प्रकाशित वर्ष

1. Castes in India : Their Machanism, Genesis and Development ( भारतातील जातिसंस्था तिची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास) १९१६ 

2. The National Dividend of India a Historical and Analytical Study (ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती) १९१६ 

3. Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) २९ जानेवारी १९३९

4. The Problem of the Rupee – Its Origin and its Solution(रुपयाचा प्रश्न – उद्गम आणि उपाय) १९२२ 

5. Pakistan or The Partition of India(पाकिस्तान अथवा भारताची फाळणी) १९४५ 

6. Annihilation  of Castes (जातीचे निर्मूलन) १९३६ 

7. Ranade,  Gandhi And Jinnah  (रानडे गांधी आणि जिन्ना) १८ जानेवारी १९४२

8. Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती) १९४२ 

9. Communal Deadlock and a Way to Solve it (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) १९४५ 

10. What Congress and Gandhi have done to the Untouchables (काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) १९४५ 

11. States and Minorities- What are their rights and how to secure them in the constitution Free India(संस्थाने आणि अल्पसंख्याक) १९४७ 

12. Maharashtra as a Linguistic Province (महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) १९४८ 

13. The rise and fall of Hindu Women (हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) १९६५ 

14. Who were the Shudras? How they came to be the Fourth Varna in Indo-Aryan Varna Society(शुद्र पूर्वी कोण होते?) १९४६ 

15. The Riddles in Hinduism (हिंदू धर्मातील कोडे)

16. Thoughts on Linguistic States (भाषिक राज्यासंबंधी विचार)

17. The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pooja Patha(पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पुजापाठ) १९९८ 

18. Revolution and Counter-Revolution (क्रांती आणि प्रतिक्रांती)

19. Buddhism and Communism(बौद्धधम्म आणि साम्यवाद) १९५६ 

20. The Buddha and His Dhamma(भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म)

धन्यवाद


No comments:

Post a Comment