Monday, August 1, 2022

सापाविषयी माहिती | Snake Informatiom

 


साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठे भक्ष्यदेखील गिळू शकतात, यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते .सापांशी निगडित अनेक गैरसमज आहेत. साप माणसांना खातो, साप बदला घेतात, काही साप मेंददू खातात. पण ह्यांत काहीही तथ्य नाही. भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावांगावांत फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. सांगली जिल्ह्यामधील ३२ शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो.कोल्हापूर जिल्ह्यातील,ढोलगरवाडी(चंदगड) या गावी नागपंचमी 

सणालासापांचे प्रदर्शन भरते.हजारो नाग या दिवसाकरिता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

समुद्रमंथनासाठी लागलेली मंदार पर्वतापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता शंकर यांनी सागरमंथना नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. विष्णू हे सदैव शेषनागाच्या शय्येवर विश्राम घेत असतात असे पुराणात सांगितले आहे[६].महाभारतातील अर्जुनाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. पंडूची पत्‍नी]] [[कुंती नागवंशीय होती

१)विषारी साप:

नाग:


नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १०चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. नागाची लांबी बरीच, म्हणजे सरासरी लांबी १.२ ते २.५ मीटर असते. नागाच्या अंगावरील खवले हे घवाच्या(?) आकाराचे असता

खाद्य-

उंदीरबेडूकसरडे, इतर छोटे प्राणी व पक्षी हे नागाचे मुख्य खाद्य आहे. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकऱ्याला मदत करत असतात. माणूस हा नागाचा मुख्य शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रूंमध्ये मुंगूसगरुडकोल्हेखोकडअस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषाचा उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघगतो व भक्ष्य मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळतो. नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे!) व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत पहारा देतोभारतीय नाग (Naja naja naja)नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १०चा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्र असतो.

नागाच्या जाती:

  • काळा नाग (Naja naja karachiensis) ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये व राजस्थानमध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.
  • शून्य आकडी नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच आहेत.
  • थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंडमलेशियाव्हिएतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. 
  • नागाचे विष:दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे वसंरक्षण हाच हेतू असतो.. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural systemवर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्ला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास एक तास ते दीड दिवस लागू शकतो.
  • प्रतविष

    नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेप्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते

  • नागाविषयी गैरसमजुती:

  • नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाण

    • नाग दूध पितो - वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही.
    • नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
    • नागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो. (या सूडाला डूख धरणे असे म्हणतात.)
    • नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो.
    • नागाला अनेक फणे असू शकतात.
    • मण्यार:

    • मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे[१]. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात
  • विष:
  • मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. . मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

    देशातील काही भागात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडतात. मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे थोडा जरी सर्पदंश झाला आणि रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो. मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही. अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो. हा साप खूप चपळ आहे. त्याचे विष खूप जहाल असते. जिभेद्वारे विष भक्षाच्या डोळ्यात टाकून सुद्धा आपली शिकार सहजतेने करतो. डोंगराळ भागात हा साप ठिकठिकाणी आढळतो. जास्तीत जास्त हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. म्हणून माणसाला हा साप चावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेस जास्त घडतात.

    मण्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन लवकर उपचार कसे करता येतील याची काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात यावर उपचार माफक दरात आहेत.

  • फुरसे 


  • (शास्त्रीय नाव : Echis, उच्चार: एकिस; इंग्लिशSaw-scaled viper) हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे.महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात त्याला "फरूड" असेही म्हटले जाते. 

  • फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ती बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेली असतात. डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी (­↑) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.

    डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात

  • .हे साप संधिप्रकाशात (पहाटे आणि संध्याकाळी) किंवा रात्री सक्रिय असतात. तरीही ते दिवसासुद्धा सक्रिय असल्याचे काही अहवाल सांगतात.दिवसा ते प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात. वाळूमय वातावरणात ते स्वतःचे शरीर वाळूत पुरून फक्त तोंड उघडे ठेवू शकतात. ते साधारणपणे पावसानंतर किंवा दमट रात्री जास्त सक्रिय असतात.

    फुरसे हा साप आक्रमक असतो. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविले, तर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून तो झटकन डोके पुढे काढतो आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेतो. या सर्व क्रिया फक्त १/३ सेकंदात होतात. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.

  • विष:

  •  प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.

घोणस


 (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया; इंग्लिश: Russell's viper) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे. हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे.


हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.[याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.

घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.

घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

घोणसाचे विष अतिशय जहाल असते.त्याचे विष Vasculotoxic प्रकारचे आहे. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍ऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

उपचार:

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.

चापडा किंवा हिरवा चापडा 

(शास्त्रीय नाव: Trimeresurus gramineus ; इंग्लिशBamboo pit viperबांबू पिट व्हायपर;) हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो.हा साप जास्तीत जास्त माणसांच्या डोक्यावर चावा घेतो.



२)बिनविषारी साप:

अजगर 


(Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर ॲंनॅकॉंडा म्हणून ओळखले जातात.


धामण (english:Common rat snake ; शास्त्रीय नाव:Ptyas mucosus) ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्र आहे परंतु अज्ञानाअभावी अनेकवेळा ती मारली जाते.

धामीणीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके, मोठे डोळे व जबड्याखालील रेषा. धामण अतिशय लांब असते. सरासरी लांबी ८ ते १० फुट असते व १२ फुटापर्यंत वाढू शकते. धामण ही डोक्यापासून शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते व शेपटी ही अतिशय टोकदार असते. त्वचा ही हलक्या अथवा गडद हिरव्या, पोपटी, गडद करड्या रंगाची असते. नागांशी रंगात व अंगावरील पट्यांमध्ये तसेच लांबीमध्ये मान उंचावून पहाण्याच्या सवयीमध्ये बरेच नागाशी साधर्म्य असल्याने बहुतेकदा नाग समजून धामीणीला मारले जाते. धामणीचा वेग हे तिचे वैशिष्ट्य आहे. अत्यंत वेगाने हालचाल करून भक्ष्य मिळवण्यात धामण पटाईत आहे.

धामणीचे मुख्य खाद्य उंदीर, घुशी व तत्सम कुरतडणारे प्राणी, एक धामण वर्षाला ६०हून अधिक उंदराचा फडशा पाडते त्यामुळे धामण ही शेतकऱ्याची मित्र आहे. मानवी हस्तक्षेप आणि औद्योगिक प्रदूषणामुळे धामणीला विविध आजार होतात. भारतात अजगर आणि नाग वगळता, धामणीवर सगळ्यात जास्त गोचिडी सापडतात. तसेच अल्बिनो (धवलता) नावाचा जनुकीय आजार ही गुजरात आणि विदर्भातून (अमरावती) नोंदविला गेला आहे. हिंदीत हा साप 'घोडापछाड' किवा 'दरश' नावाने प्रसिद्ध आहे.

गवत्या हा आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत Green Keelback किंवा Lead Keelback असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो. गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही. बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मिलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात.

हरणटोळ 


 (इंग्लिश: Green Vine Snake) हा झाडांतून वस्ती करणारा साप आहे.

वास्तव्य- गाव,शहर,रानात खाद्य -पक्षी त्यांची अंडी,पाल,सरडे इत्यादी

हरणटोळ हा भारतात जंगलांमध्ये सापडतो. हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो,

हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो, त्यची जीभ ही लांब आणि गडद हिरव्या रंगाची असते जीने तो आजूबाजूच्या स्तिथीचा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.

एका वयस्क हरणटोळचा घेर २ सेमी असून लांबी २ मीटर पर्यंत वाधू शकते. तो आपल्या लांब शेपटीचा वापर झाडावर चडताना किव्वा शिकार करताना माकडा सारख्या फांद्यांना पकडायला वापरतो. दुसऱ्या सापांपेक्षा याचे डोके लांब असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.

हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला वाचवण्यासाठी पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगाच्या झाडांमध्ये गायब होण्याच्या सवयीवर अवलंबून असतो. हरणटोळ हा पाली. सरडे. बेडूक आणि इतर कुर्ताडणाऱ्या प्राण्यांना खातो. तो आपल्या भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळून खातो.

हरणटोळ हा माध्यम विषारी साप आहे, जरी त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो तर मोठ्यांना माधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही आहे.

आजकाल हरणटोळ हा अनेक ठिकाणी पेट म्हणून ठेवण्यात येत आहे, जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते. बाजारात सुद्धा त्यची विक्री होण वाढलेलं आहे, त्वचेच्या रंगामुळे लोकांच्या पसंतीस आल्यामुळे घरात पाळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र सापाच्या जंगलातील संख्येवर आणि बंदिस्त अवस्थेत त्याच मरण्यात होत आहे.

पाणसाप हे आपल्या जीवनाचा मोठा भाग पाण्यात घालविणारे साप असतात. गोड्या पाण्यातील पाणसाप आणि खाऱ्या पाण्यातील पाणसाप हे यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.

गोड्या पाण्यातील पाणसाप हे ॲक्रोकॉर्डिडे कुळातील असतात तर खाऱ्या पाण्यातील पाणसाप हायड्रोफीनॅ कुळातील असतात.

मांडोळ हा एक बिनविषारी साप आहे.

  • मराठी नाव- मांडूळ, दुतोंड्या(वर्धा),माटीखाया(विदर्भ),मालण(गोवा). इंग्रजी नाव-Earth Boa/ Red Sand Boa. शास्त्रीय नाव-Eryx johnii
  • सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी.तोंड व शेपटी आखूड.डोळे लहान,बाहुली उभी.जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो.
  • सरासरी लांबी-75सें.मी.(2फूट 6इंच). अधिकतम लांबी-100सें.मी.(3फूट3इंच)
  • प्रजनन-ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मादी एकावेळेस साधारण 6-9 पिलांना जन्म देते. पिलांचा रंग लालसर तपकिरी व त्यावर काळ्या रंगाचे पूर्ण गोलाकृती पट्टे. हे पट्टे कालांतराने नाहीसे होतात.
  • खाद्य-मुख्यतः उंदीर किंवा लहान सस्तन प्राणी,पाली.सऱडे,छोटे पक्षी
  • आढळ- महाराष्ट्रात सर्वत्र
  • वास्तव्य-मऊ जमिनीत बिळात राहणारा हा साप कोरड्या जागा पसंद करतो.पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास जमिनीवर येतो.
  • वैशिष्ट्ये- निशाचर, तोंड व शेपटी साधारण सारखीच दिसते

दिवड हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सापाला विरोळा अथवा इरूळा असं देखील म्हणतात.प्रमाण भाषेत याला दिवड म्हणतात. दिवड म्हणजे Checkered Keelback हा साप पाण्यात अथवा पाण्याजवळ राहतो. दिवड हा पोहोण्यामध्ये तरबेज सर्प आहे. तो बिनविषारी साप आहे. रंगाने पिवळसर व गडद खाकी असतो. त्याच्या अंगावर बुद्धीबळातील पटाप्रमाणे काळे पट्टे असतात. लांबी तीन ते पाच फुट एवढी असते, डोके आकाराने लहान व डोळ्याची बाहुली गोल काळसर रंगाची असते. त्याच आवडते खाद्य म्हणजे मासे व छोटे बेडूक. इतर सापांच्या तुलनेत हा साप चपळ असतो. चपळ असल्याने पटकन चावतो
    
साप चावल्यावर काय करावे?

साप चावला की माणूस भीतीनेच अर्धा मरतो. मग काही कधी वाचलेले-ऐकलेले प्रथमोपचार आठवतात आणि आपण माणूस वाचवायचा प्रयत्न करतो. ही वेळ तशी कधी सांगून येत नाही. म्हणूनच आज बोभाटा सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करु नये याची माहिती घेऊन आलं आहे. या साध्यासोप्या ७ गोष्टी लक्षात ठेवल्या, तर आपलं आणि अशा अडचणीत सापडलेल्यांचं आयुष्य थोडं सुखकर होईल..

१. जगात फक्त २०% साप विषारी असतात. तुम्हाला चावलेला साप विषारी जरी निघाला तरी त्याचा दंश विषारी असेल याची शक्यता फक्त ५०% असते.  बऱ्याच वेळा साप 'कोरडा दंश' (म्हणजे विनाविषाचा दंश) देतो. पण जर तुम्हाला दुर्दैवाने 'ओला दंश' (म्हणजे विषारी दंश) झाला असेल तरी सुद्धा घाबरून जायचे कारण नाही. योग्य आणि वेळेत मिळालेल्या वैद्यकीय सेवेने तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही.

२. साप चावल्यानंतर माणूस फार घाबरून जातो. त्यामुळे त्याचा हृदयाचा वेग वाढून शरीरात विष अधिक गतीने पसरु लागते. म्हणून धैर्य आणि विश्वास बाळगा. प्रथम एका सुरक्षित/मोकळ्या जागेवर जा व खाली बसून घ्या. एकटे असाल तर त्वरित १०८ किंवा ११२ नंबरवर फोन करून अम्ब्युलन्सला थोडक्यात आपली माहिती सांगा (नाव, पत्ता आणि प्रॉब्लेम).  जवळच्या लोकांना बोलावून घ्या. एकटे नसाल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन लवकरात लवकर जवळचे इस्पितळ गाठा. तिथे डॉक्टर तुम्हाला अँटी-वेनम देतील. दंश केलेल्या सापाचे थोडेफार जरी वर्णन करता आले तरी डॉक्टरांना मदतच होईल. सापाचा रंग, लांबी, पट्टे, मानेवरील रेषा, वगैरे अशी महिती तुम्ही देऊ शकलात तर उत्तम. तुम्हाला जर साप नीट दिसला नसेल तरीही अडचण नाही. पण सापाला पकडायला अथवा मारायला जाऊ नका. तसे केल्यास तो पुन्हा चावण्याची शक्यता तर असतेच, शिवाय तुम्ही तुमचा अनमोल वेळसुद्धा वाया घालवता.


अधिक माहितीसाठी संदर्भ पुस्तके
  • आपल्या भारतातील साप (मूळ इंग्रजी लेखक -रोम्युलस व्हिटेकर; मराठी अनुवाद मारुती चितमपल्ली)
  • महाराष्ट्रातील साप (खं.ग. घारपुरे) (१९२८)
  • सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स (वीणा गवाणकर)
  • सर्पपुराण (मधुकर विश्वनाथ दिवेकर)
  • सर्प मित्रांच्या सर्पकथा (विलास काणे)
  • सर्पविज्ञान (उल्हास ठाकूर)
  • साप (नीलमकुमार खैरे)
  • साप : आपला मित्र (प्रदीप कुळकर्णी)
  • साप : समज व गैरसमज (संतोष टकले)
  • साप आपले मित्र (राहुल शिंदे)
  • महाराष्ट्रातील साप (राहुल शिंदे)
  • सापांविषयी (मूळ इंग्रजी लेखक - झई आणि रोम व्हिटेकर; मराठी अनुवाद वसंत शिरवाडकर)
  • स्नेक्स ऑफ इंडिया (पी.जे. देवरस)
  • हिंदुस्थानातील साप (विष्णूशास्त्री चिपळूणकर) (१८९४)

No comments:

Post a Comment